स्थायी समितीचे २० प्रस्ताव लांबणीवर

Foto

मनपा आयुक्त येडगे सुटीवर गेल्याने बैठक तहकूब
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे अचानक सुट्टीवर गेल्याने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेली स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. सभापती अनिल मकरिये यांनी हा निर्णय घेतला. या बैठकीच्या विषयपत्रिकेवर विकासकामे, मालमत्तांविषयीचे निर्णय
आणि विविध ठेके यांसंदर्भातील तब्बल २० महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते, मात्र आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे हे सर्व निर्णय आता लांबणीवर पडले आहेत.
महापालिका मुख्यालयात शुक्रवारी सकाळी ११:३० वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली
अधिकार असतानाही बैठक का नाही?
▶ बैठकीला आयुक्त उपस्थित राहू शकत नसतील, तर ते आपल्या अनुपस्थितीत इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला अधिकार प्रदान करू शकतात. मात्र, तसा पर्याय न वापरता थेट बैठकच तहकूब का करण्यात आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर विषयपत्रिकेवर चर्चा सुरू होताच, आयुक्त उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. आयुक्तांशिवाय महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत
महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहणार
▶ विषयपत्रिका चर्चेसाठी येताच आयुक्त उपस्थित नसल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित राहणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सभापतींनी बैठक तहकूब करण्याची घोषणा केली. विषयपत्रिकेत हिमायत बाग परिसरातील एसबीएच कॉलनीतील सिमेंट रस्त्यासाठी २८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव होता. मयूरबन कॉलनीतील खुल्या जागेवरील जीर्ण बांधकाम पाडणे, मित्रनगर येथे जलकुंभ उभारण्यासाठी जुनी शाळेची इमारत व कर्मचारी निवासस्थाने पाडण्याची परवानगी देणे, हसूल तलावातील मत्स्य व्यवसायाचा ठेका अंतिम करणे, सिद्धार्थ उद्यानातील शौचालय खासगी व्यक्तीला चालविण्यास देणे, व्यापारी संकुलातील आठ गाळे भाडेतत्त्वावर देणे आणि पेठेनगर येथील सभागृह भाडेतत्त्वावर देणे, असे महत्त्वाचे विषय होते. किल्लेअर्क येथील करूणा बुद्ध विहार आणि सुधाकरराव भुईगळ सामाजिक सभागृहाच्या नूतनीकरणासाठी ६२ लाख रुपयांच्या खर्चाची निविदा मंजूर करण्याचाही प्रस्ताव होता.
सभापती मकरिये यांनी बैठक तहकूब
करण्याची घोषणा केली.